पापांपासून सुटका होऊन तारण होणे आणि पवित्र आत्मा मिळणे या दोन विषयांवर ख्रिस्ती लोकांत जास्त चर्चा केली जाते. ह्रा दोन महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल फक्त थोड्याच लोकांना नीट माहिती आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो असं पुष्कळ लोक म्हणतात पण प्रत्यक्षांत ते तारण होणे आणि पवित्र आत्मा मिळणे याबद्दल अज्ञानांत असतात.
ज्या सुवार्तेमुळे पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ शकेल ती सुवार्ता तुम्हांला माहित आहे का? तुम्हांला जर देवाकडे पवित्र आत्मा मागायचा असेल तर प्रथम तुम्ही पाणी व आत्मा याबद्दल विश्वासपूर्वक ज्ञान मिळवले पाहिजे. जगांत असलेल्या सर्व ख्रिस्ती लोकांना त्यांच्या पापांची क्षमा होऊन त्यांना पवित्र आत्मा मिळण्यासाठीं योग्य मार्गदर्शन या पुस्तका द्वारे व्हावे हीच आमची प्रार्थना आहे.