ह्रा पुस्तकांतील शब्द तुमच्या ह्मदयात असलेली तहान भागवील. दररोज करीत असलेल्या पापांसाठी काय करायला पाहिजे, त्यासाठीं कोणते उपाय आहेत याबद्दल आज अनेक ख्रिस्ती लोक अज्ञानांत आहेत. तुम्हांला देवाचे नीतिमत्त्व म्हणजे काय ते माहित आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून या पुस्तकांत प्रगट केलेल्या देवाच्या नीतिमत्त्वावर तुम्ही विश्वास ठेवाल अशी लेखकाला आशा वाटते.
न्याय, पवित्रीकरण, पूर्वीच नेमलेले या सारख्या ख्रिस्तीशास्त्रलेखांमुळे अनेक लोक आज घोटाळ्यांत पडलेले आहेत; आणि अनेक विश्वासू ख्रिस्ती लोकांची मने भकास झालेली आहेत. पण आता ख्रिस्ती लोकांनी देवाचे नीतिमत्त्व काय हे समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
या पुस्तकामुळे तुमच्या अंतःकरणांस समजून घेण्याची क्षमता येऊन शांति मिळेल अशी आशा आहे. देवाचे नीतिमत्त्व समजून घेण्याने तुम्ही आशीर्वादीत व्हावे हीच लेखकाची इच्छा आहे.