जुन्या करारांत देवानें मोशेला निवासमंडप बांधण्याची आज्ञा केली होती तसेच नव्या करारांत, देवाची इच्छा आहे कीं आपण सुद्धां प्रत्येकाने आपल्या ह्मदयांत एक मंदिर बांधावे ह्रासाठीं कीं आपल्या ठायीं त्याला वस्ती करता यावी. हे मंदिर आपण आपल्या ह्मदयांत जी साहित्यें वापरून बांधू शकतो ती विश्वासाची साहित्यें म्हणजे पाणी व आत्म्याच्या सुवार्तेची वचने आहेत. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेच्या साहित्यांनी आपण आपली सर्व पापें धुऊन शुद्ध झाले पाहिजे. देव आपल्याला त्याच्यासाठीं मंदिर बांधण्यास सांगत असतांना आपली ह्मदयें रिकामी करण्यास आणि पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरण्यास पण सांगत आहे. आपण सर्वांनी पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरण्याद्वारें आपली ह्मदयें शुद्ध केलीच पाहिजे.
पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरण्याद्वारें आपण आपल्या ह्मदयांतील पापें धुऊन टाकली कीं मग देव आपल्या शुद्ध ह्मदयांत वस्ती करण्यास येतो. पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरण्याद्वारें तुम्ही तुमच्या ह्मदयांत पवित्र मंदिर बांधू शकता. तुमच्यापैकी कांही जणांनी आतापर्यंत पश्चात्तापाच्या प्रार्थना म्हणून ह्मदयें स्वच्छ करण्याचे आणि स्वतःहून मंदिर बांधण्याचे प्रयत्न केले असल्याची दाट शक्यता आहे. परंतु आता हा खोटा विश्वास फेकून देण्याची आणि पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरण्याद्वारें तुमच्या मनांचे नूतनीकरण होण्यायोगे तुम्ही पालटले जाण्याची हीच वेळ आहे.
ھور