निवासमंडपांत दडलेले सत्य आपण कसे काय शोधून काढू शकतो? निवासमंडपाचा खरा मुख्य भाग म्हणजे पाणी व आत्म्याची सुवार्ता आहे. ही सुवार्ता केवळ समजून घेण्यानेच आपल्याला ह्रा प्रश्नाचे अचूक उत्तर समजू शकते.
खरं म्हणजे निवासमंडपाच्या अंगणाच्या दारांत ठळकपणे दिसून येणारे निळे, जांभळे व किरमिजी रंगाचे सूत आणि बारीक कातलेल्या सुताचे वेलबुट्टीदार कापड आपल्याला नव्या कराराच्या काळांतील येशू ख्रिस्ताची कार्यें दाखवून देत आहेत, ही तीच कार्यें आहेत जिच्यामुळे मानवजातीचे तारण झालेले आहे. कुशलतेने धागे गुंफून कापड विणलेले असावे त्याप्रमाणे जुन्या करारांत निवासमंडपासंबंधी असलेली देवाची वचने ही, नव्या करारांत असलेल्या वचनाबरोबर परस्पराशी अति निकटतेने जुळलेली आहेत. पण दुर्दैवाने हे सत्य ख्रिस्ती धर्मामध्ये प्रत्येक सत्यशोधकापासून दीर्घ काळपर्यंत दडून राहीलेले आहे.
ह्रा पृथ्वीवर आल्यानंतर येशू ख्रिस्तानें योहानाकडून बाप्तिस्मा घेतला होता आणि वधस्तंभावर त्याचे रक्त ओतले होते. पाणी व आत्म्याची सुवार्ता समजून घेतल्याशिवाय आणि तिच्यावर विश्वास धरल्याशिवाय आपल्यापैकी कोणीहि निवासमंडपांत प्रकट झालेले सत्य कधीहि शोधू शकणार नाहीं. आपण आता हे सत्य शिकून घेतलेच पाहिजे आणि त्यावर विश्वास धरलाच पाहिजे. निवासमंडपाच्या अंगणाच्या दाराच्या निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या धाग्यामध्ये आणि बारीक कातलेल्या सुताच्या वेलबुट्टीदार कापडामध्ये स्पष्टीकृत झालेले सत्य समजून घेण्याची व त्यावर विश्वास धरण्याची आपल्याला गरज आहे.