प्रेषितांच्या ठायीं जो विश्वास होता तोच विश्वास आपण सर्वांनी धरलाच पाहिजे, कारण त्यांचा विश्वास आणि त्यांच्या श्रद्धा ह्रा पवित्र आत्म्यापासून आलेल्या होत्या. प्रेषितांनी येशू ख्रिस्त, त्याचा पिता आणि पवित्र आत्मा ह्रांच्यावर त्यांचा देव म्हणून विश्वास धरला होता.
प्रेषित पौलानें कबुली दिली होती कीं तो ख्रिस्ताबरोबर मरण पावला होता आणि त्याच्याबरोबर जगत होता. येशू ख्रिस्तामध्ये त्याचा बाप्तिस्मा झाला होता असा त्याचा विश्वास होता (गलतीकरांस पत्र 3:27) आणि ह्रा विश्वासाद्वारें तो देवाचे साधन बनला होता. देवाच्या सुवार्तेंत आपल्याला येशूनें घेतलेला बाप्तिस्मा, त्यानें वधस्तंभावर ओतलेले त्याचे रक्त आणि ह्रा सुवार्तेवर विश्वास धरणाया प्रत्येक व्यक्तीला देवाकडून मिळणारे पवित्र आत्म्याचे दान ही दिसून येतात.
ही मूळ सुवार्ता तुम्हांला माहीत आहे का? तिच्यावर तुमचा विश्वास आहे का? ही तीच सुवार्ता आहे जिच्यावर प्रेषितांनी सुद्धां विश्वास धरला होता. म्हणूनच आपण सर्वांनी सुद्धां पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरलाच पाहिजे.
もっと見る