आजचे अनेक ख्रिस्ती लोक प्री-ट्रीब्युलेशन रॅपचरच्या थियरीवर विश्वास धरून आहेत ह्राचे कारण म्हणजे सात वर्षाचे मोठे संकट यायच्या आधीच ते वर उचलून घेतले जातील ह्रा खोट्या शिकवणीला ते चिकटून राहिले आहेत, म्हणूनच ते आता सुस्तीच्या नशेंत बुडून गेलेली निष्क्रिय धार्मिक जीवनें जगत आहेत.
परंतु सात कण्र्यांच्या पीडा क्रमाने एकामागे एक घडू लागतील आणि सहावी पीडा ओतली जाईल तेव्हां पवित्रजनांचे रॅपचर होईल - म्हणजेच सबंध जगांत गोंधळ माजलेला असतांना ख्रिस्तविरोधकाचा उदय होऊन नव्याने जन्मलेले पवित्रजन जिवे मारले जातील आणि सातवा कर्णा वाजेल तेव्हां येशू स्वर्गातून खाली उतरेल. हीच ती वेळ जेव्हां नव्यानें जन्म घेतलेल्या पवित्रजनांचे पुनरुत्थान आणि रॅपचर घडून येणार आहे. (थेस्सलनीकाकरांस पहिलें पत्र 4:16-17)
जे नीतिमान "पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर" विश्वास धरण्याद्वारें नव्यानें जन्मले आहेत त्यांचे पुनरुत्थान होईल आणि ते रॅपचरमध्ये भाग घेतील आणि त्यानंतर ते सहस्त्रवर्षीय राज्याचे व स्वर्गाच्या सार्वकालिक राज्याचे वारीस होतील, परंतु जे पापी ह्रा पहिल्या पुनरुत्थानांत भाग घेऊं शकणार नाहीत त्यांना देवाकडून ओतल्या जाणाया सात वाट्यांच्या मोठ्या सजेला सामोरे जावे लागेल आणि नंतर देवाकडून नरकाच्या सार्वकालिक अग्नींत टाकले जाण्याची शिक्षा त्यांना प्राप्त होईल.
ပိုများသော